आजगावच्या वेतोबाचा सुवर्णमहोत्सव!.....४ मे पासून भक्ती आणि संस्कृतीचा संगम

आजगावच्या वेतोबाचा सुवर्णमहोत्सव!.....४ मे पासून भक्ती आणि संस्कृतीचा संगम

आजगाव

 

      सावंतवाडी तालुक्यातील आजगाव येथील जागृत देवस्थान श्री देव वेतोबा, रवळनाथ, भूमिका पंचायतन देवस्थानच्या मूर्ती पुनःप्रतिष्ठापनेचा 50 वा सुवर्णमहोत्सवी वर्धापन दिन सोहळा शुक्रवार, 8 मे 2026 रोजी मोठ्या भक्तिभावात साजरा होणार आहे. या सोहळ्यानिमित्त दि. 4 मे ते 11 मे 2026 या कालावधीत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी भाविकांसाठी आयोजित करण्यात आली आहे. 

मंगळवार 5 मे
सकाळी गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठा, महारुद्र अभिषेक. सायंकाळी 'स्वर संगम' संगीत कार्यक्रम, लिंगेश्वर पावणाई भजन व रात्री 9.30 वा. श्री वावळेश्वर दशावतार नाट्य मंडळाचा ट्रिक्स-सिन युक्त नाट्यप्रयोग 'नरकुंजर वक्रतुंड'

बुधवार 6 मे
गोव्यातील भजन मंडळांचे सादरीकरण व रात्री 9.30 वा. सिंधू स्टार सिंधुदुर्ग प्रस्तुत गायन, नृत्य, लावणीचा ऑर्केस्ट्रा 

गुरुवार 7 मे
     सकाळी होमहवन, पूर्णाहुती. सायंकाळी ह.भ.प. चिंतामणी सामंत यांचे कीर्तन व रात्री 10 वा. साई कला मंच पिंगुळीचा 'रंगी रंगला महाराष्ट्र'

शुक्रवार 8 मे
पहाटे 4.30 वा. वर्धापन दिन सोहळा, धार्मिक विधी. दुपारी महाप्रसाद. रात्री 9 वा. भव्य पालखी मिरवणूक व नाट्यप्रयोग 

शनिवार 9 मे
सकाळी सत्यनारायण पूजा, सायंकाळी प.पू. पोळजी गुरुजी यांचे प्रवचन व रात्री 'शूर शिवराया' संगीत कार्यक्रम 

रविवार 10 मे
सकाळी नवचंडी, सायंकाळी राजेंद्र बुवा मांडेवाल यांचे कीर्तन व रात्री 'फॅमिली लय भारी'धमाल मराठी विनोदी नाटक 

सोमवार 11 मे
दुपारी महाआरती, महाप्रसाद व सायंकाळी 5 वा. गणेशमूर्तीचे वाजत-गाजत विसर्जन 

     समस्त मानकरी, विर्तिक व ग्रामस्थ आजगाव यांच्या वतीने सर्व ग्रामस्थांनी व भाविकांनी या 8 दिवसीय सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. दररोज दुपारी १:३० वाजता महाप्रसाद आयोजित केला आहे.