युवा नेते विशाल परब यांच्या वतीने धाकोरे नं. १ शाळेत शैक्षणिक साहित्यांचे वाटप
सावंतवाडी
सिंधुदुर्ग जिल्हा युवा भाजप नेते विशाल परब यांच्या वतीने जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, धाकोरे नं. १ येथे विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या शिक्षणातील अडचणी दूर करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.या उपक्रमांतर्गत इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना शालेय दप्तर व वह्यांचे मोफत वितरण करण्यात आले. तसेच अंगणवाडीतील सर्व बालकांनाही दप्तरांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून विशालजी परब यांच्या शैक्षणिक योगदानाचे कौतुक करण्यात येत आहे.कार्यक्रमाला श्री ओमकार प्रभू आजगावकर, श्री गोविंद साटेलकर, श्री गिरीश परब, श्री महेश कोठावळे, श्री राजू साटेलकर, श्री संदीप मुळीक आणि श्री दीपक मुळीक यांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेचे मुख्याध्यापक श्री दिगंबर तळणकर यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक श्री सोनल जाधव यांनी केले. यावेळी उपशिक्षिका श्रीमती सुजाता गाड, स्वयंसेविका कु. दिव्या काकतकर, अंगणवाडी सेविका श्रीमती साटेलकर तसेच मदतनीस श्रीमती मुळे उपस्थित होत्या.या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत मिळाल्याने पालकांनी समाधान व्यक्त करत विशाल परब यांच्या सामाजिक बांधिलकीचे स्वागत केले.
konkansamwad 
