तळकट-कुंभवडे रस्त्यावर भरदिवसा बिबट्याचे दर्शन

तळकट-कुंभवडे रस्त्यावर भरदिवसा बिबट्याचे दर्शन

बांदा

 

     तळकट-कुंभवडे मार्गावर एका बिबट्याचे दर्शन झाले. बांदा येथील एक युवक या मार्गावरून जात असताना त्याला हा बिबट्या रस्त्यावर पाहायला मिळाला. भरदिवसा बिबट्या दिसल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. विशेष म्हणजे ज्या भागातून हा बिबट्या संचार करताना दिसला, तो परिसर 'इको सेन्सिटिव्ह' म्हणून ओळखला जातो. याच भागातून सध्या वादग्रस्त ठरलेला 'शक्तीपीठ महामार्ग' प्रस्तावित आहे. या वनक्षेत्रात वन्यजीवांचा मोठा वावर असल्याचे या घटनेने पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे.कुंभवडे मार्गावर बिबट्या रस्ता ओलांडताना किंवा रस्त्याच्या कडेला वावरताना थेट नजरेस पडल्यामुळे या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मात्र, दुसरीकडे निसर्गप्रेमींनी याकडे जैवविविधतेचे प्रतीक म्हणून पाहिले आहे. शक्तीपीठ महामार्गामुळे येथील पर्यावरणाला आणि वन्यजीवांच्या अधिवासाला धोका निर्माण होऊ शकतो, अशी चर्चा आता या बिबट्याच्या दर्शनानंतर स्थानिक ग्रामस्थांमध्ये सुरू झाली आहे.