ऐतिहासिक भगवंतगड किल्ला पर्यटनाच्या नकाशावर येणार - मंत्री आशिष शेलार
मसुरे
मालवण तालुक्यातील भगवंतगड हा प्राचीन ऐतिहासिक किल्ला आहे. या किल्याला गतवैभव प्राप्त व्हावे यासाठी पुरातत्व विभागाला डिजिटल सर्व्हे पूर्ण करून प्रस्ताव करण्या बाबत आदेश देण्यात आले आहेत. पर्यटन दृष्ट्या या भागाचे महत्व या किल्ल्यामुळे निश्चितच वाढणार आहे असे प्रतिपादन राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी येथे केले. मंत्री महोदयानी मालवण तालुक्यातील चिंदर जवळील भगवंतगड किल्ला येथे भेट देऊन या किल्याची पाहणी केली. कालावल खाडीच्या उत्तर काठावर वसलेल्या या किल्यावरील सिद्धेश्वर मंदिर येथे दर्शन घेऊन प्रथम त्यांनी आशीर्वाद घेतले. भाजप मालवण तालुका तसेच ग्रामपंचायत चिंदर यांच्या वतीने मंत्री आशिष शेलार यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, तहसीलदार गणेश लव्हे, जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर, पुरातत्व विभाग डायरेक्टर तेजस गर्गे, सहाय्यक संचालक विलास वहाने, मंत्री महोदय ओएसडी शरद डोके, आचरा पोलीस निरीक्षक श्री पोवार, भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, प. स. सदस्य दीपक सुर्वे, महिला अध्यक्ष समृद्धी आस्वलकर, चिंदर सोसायटी अध्यक्ष देवेंद्र हडकर, ग्रामपंचायत अधिकारी भगवान जाधव आदी उपस्थित होते. यावेळी मंत्री आशिष शेलार यानी भगवंतगड किल्ला येथील ढासळलेले बुरुज, पुरातन तुळशी वृंदावन, भुयारी मार्ग याची पाहणी करून पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांना आवश्यकत्या सूचना दिल्या.भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यानी राज्य शासनाच्या माध्यमातून या किल्यासाठी जास्तीचा निधी मिळावा अशी मागणी केली. यावेळी महेश मांजरेकर, संतोष गावकर, उद्योजक प्रकाश मेस्त्री, रवींद्र गोसावी, पोलीस पाटील हर्षद बेनाडे, श्री आचरेकर, निखिल माळकर, बंटी भोवर, श्री गोलतकर, रणजित दत्तदास, दिगंबर जाधव, विश्राम माळगावकर, समीर अपराज, राजू परब आदी उपस्थित होते. आभार धोंडी चिंदरकर यानी मानले.
konkansamwad 
