वाचन प्रेरणा दिन ओसरगावात उत्साहात साजरा
ओसरगाव
कै. विनय आळवे वाचनालय व ग्रंथ संग्रहालय, ओसरगाव येथे भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने आकर्षक ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.
या प्रदर्शनाचे उद्घाटन ओसरगावचे उपसरपंच गुरुदास सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कानसळी पू. प्रा. शाळेचे मुख्याध्यापक श्री. गोसावी, शिक्षक श्री. नंदकुमार हरमलकर, माजी उपसरपंच श्री. बबली राणे, ग्रंथालय अध्यक्ष श्री. दीपक आळवे, सेक्रेटरी श्री. किशोर सावंत, ग्रंथपाल सौ. दीपाली आळवे, वाचक श्री. संतोष गोरे तसेच प्राथमिक शाळेचे विद्यार्थी व वाचक उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान उपस्थित वाचकांनी एक तास वाचनालयात पुस्तकांचे वाचन केले व वाचनासाठी पुस्तके घेऊन गेले.कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष श्री. दीपक आळवे व सेक्रेटरी श्री. किशोर सावंत यांनी केले, तर आभार ग्रंथपाल सौ. दीपाली आळवे यांनी मानले.

konkansamwad 
