वेंगुर्ला भाजपा कार्यालयात अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी

वेंगुर्ला भाजपा कार्यालयात अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी

 

वेंगुर्ला

 

       राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी सोहळ्या निमित्ताने वेंगुर्ला भाजपा कार्यालयात अहिल्यादेवीच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनचरित्रावर भाजपा महिला उपाध्यक्ष सौ. सुषमा खानोलकर यांनी मार्गदर्शन केले तसेच जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना राजमाता अहिल्यादेवी यांनी धर्म, समाज, संस्कृती व राजकारण या सर्व क्षेत्रामध्ये अद्वितीय असे कार्य करून एक आदर्श प्रस्थापित केला आहे. न्यायाची प्रतिमूर्ती म्हणून त्यांच्याकडे लोक आदराने पाहत. त्यांची ३००वी जयंती साजरी करत असताना प्रत्येकाने त्यांचा आदर्श आपल्या जीवनात उतरविण्याचा संकल्प करावा. असे सांगितले. 
   यावेळी मंडल अध्यक्ष पप्पू परब, माजी मंडल अध्यक्ष सुहास गवंडळकर, शक्तिकेंद्रप्रमुख प्रशांत आपटे, वृंदा गवंडळकर, आकांशा परब, युवामोर्चा सरचिटणीस वैभव होडावडेकर, युवामोर्चाचे संतोष सावंत, हसिना मकानदार, शमिका बांदेकर, परबवाडा सरपंच कार्तिकि पवार, स्वरा देसाई, अरुणा गवंडे,परबवाडा ग्रामपंचायत सदस्य सुहिता हळदणकर, बूथ प्रमुख प्रमोद गोळम आदी उपस्थित होते.