सावंतवाडीच्या मोती तलाव येथे पारंपरिक उत्साहात नारळी पौर्णिमा संपन्न
सावंतवाडी
येथील ऐतिहासिक मोती तलावात नारळी पौर्णिमेनिमित्त सालाबादप्रमाणे पारंपरिक उत्साहात नारळ अर्पण करण्यात आला.प्रथेनुसार सावंतवाडी पोलीस ठाण्यातून मानाचा नारळ वाजत-गाजत मोती तलावावर आणण्यात आला. त्यानंतर सावंतवाडी संस्थानचे राजेसाहेब खेमसावंत भोसले आणि पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या हस्ते मानाच्या सुवर्ण नारळाचे विधिवत पूजन करून तो तलावात अर्पण करण्यात आला.नारळ तलावात अर्पण करताच उपस्थित तरुणांनी पाण्यात उड्या मारून नारळ मिळवण्यासाठी एकच गर्दी केली. यावर्षी मात्र दरवर्षीच्या तुलनेत मोती तलाव परिसरात नागरिकांची गर्दी काहीशी कमी दिसून आली.या सोहळ्याला सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले, नगराध्यक्षा श्रद्धा भोसले, सभापती आनंद नेवगी, सुधीर आडीवरेकर, माजी नगरसेवक सुरेंद्र बांदेकर, दिलीप भालेकर, काका मांजरेकर, कृष्णा राऊळ, पोलीस कर्मचारी हनुमंत धोत्रे, आबा पिळणकर, पुंडलिक सावंत आदींसह सावंतवाडीकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
konkansamwad 
