गणित प्रज्ञाशोध परीक्षेत श्रीवर्धन पारकरला सुवर्णपदक

मालवण
महाराष्ट्र गणित अध्यापक मंडळतर्फे घेतल्या जाणाऱ्या गणित प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रेवतळे मालवणचा विद्यार्थी श्रीवर्धन संदीप पारकर याने शिष्यवृत्ती बरोबरच सुवर्णपदक प्राप्त केले आहे. प्रज्ञाशोध परीक्षेच्या राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत गोल्डन कॅटेगरीत येणारा तो सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव विद्यार्थी ठरला आहे. त्याच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्याचे कौतुक होत आहे.