सह्याद्री फाउंडेशनच्या वतीने आज 'कृष्ण हनुमान युद्ध' दशावतार नाट्यप्रयोग......शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या वाढदिवसाचे औचित्य
सावंतवाडी
सह्याद्री फाउंडेशन सावंतवाडीच्या वतीने फाउंडेशनचे माजी अध्यक्ष श्री. संजु परब यांच्या वाढदिवसानिमित्त आज भव्य दशावतार नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे. सिद्धेश्वर दशावतार नाट्यमंडळ दोडामार्ग यांचा 'कृष्ण हनुमान युद्ध' हा नाट्यप्रयोग सादर होणार आहे.हा नाट्यप्रयोग आज सायंकाळी ७ वाजता गोविंद चित्र मंदिर, सावंतवाडी येथे होणार असून नाट्यप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या नाट्यप्रयोगाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सह्याद्री फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री. सुनिल राऊळ आणि विद्यमान अध्यक्ष रविंद्र मडगावकर यांनी केले आहे.
konkansamwad 
