इन्सुली रमाईनगरात छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त अभिवादन !
इन्सुली
भीमगर्जना युवक मंडळ इन्सुली रमाईनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिरात लोकराजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची 152 वी जयंती मोठ्या उत्साहात मंडळाचे अध्यक्ष अरविंद जाधव यांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली. यावेळी मंचावर ह्यूमन राइट कोकण विभागाचे उपाध्यक्ष आनंद जाधव व मंडळाचे सचिव धम्मचारी लोकदर्शी तसेच महिला मंडळाच्या वृषाली जाधव, सविता जाधव यांच्या हस्ते शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार व दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
लोकदर्शी यांनी जयंतीच्या शुभेच्छा देताना शाहू महाराजांच्या कार्याचा आढावा घेऊन अस्पृश्यता निर्मूलन करण्यासाठी आपल्या राज्यात कायदा लागू करणारे भारतातले पहिले राजे असल्याचे सांगत प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत करण्याचा महत्त्वाचा निर्णय त्यांनी घेतला. शिक्षण व नोकरीत आरक्षण देऊन अस्पृश्यांसाठी विकासाचा मार्ग खुला केला. सावकारांच्या पिवळणुकीतून मुक्त करण्यासाठी शेतकऱ्यांसाठी बिनव्याजी कर्जाची सोय करून दुष्काळात कर्जमाफी देण्याची अंमलबजावणी केली. जाहीर सभेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची ओळख अस्पृश्यांचा नेता अशी करून बाबासाहेब जेव्हा एस.एस. सी. परीक्षेत उत्तीर्ण झाल्यावर स्वतः राजांनी एक अस्पृश्य विद्यार्थ्यासाठी हत्तीवर बसून संपूर्ण कोल्हापूर नगरीत साखर वाटल्याची घटना जगाच्या इतिहासात पहिली असल्याचे सांगीतले. तसेच "माझी जयंती साजरी करण्यापेक्षा आपले राजे छञपती शाहू महाराज यांची जयंती दिवाळी सारखी मोठ्या उत्साहात साजरी करा;"या बाबासाहेब आंबेडकरांच्या वाक्याची आठवण करुन दिली.
या कार्यक्रमात कृष्णा जाधव, दिपेश जाधव, तन्मय जाधव, संजना जाधव, अनुजा जाधव, स्मिता जाधव, लैला जाधव, ललिता जाधव, सृष्टी जाधव, सेजल जाधव, दीपाली जाधव, प्रद्युम जाधव, यज्ञेश जाधव, अमृत जाधव इत्यादी ची उपस्थिती होती.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल जाधव यांनी तर आभार योगेश जाधव यांनी मानले.
konkansamwad 
