RRB स्टेशन मास्टर भरती २०२६ : १२५० पदांसाठी भरती जाहीर, उद्यापासून अर्ज सुरू
नवी दिल्ली
रेल्वेमध्ये सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रेल्वे भरती बोर्डाने (RRB) स्टेशन मास्टरच्या सुमारे १,२५० पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया २७ ऑक्टोबरपासून सुरू होणार असून अर्ज करण्याची अंतिम तारीख २५ नोव्हेंबर २०२६ आहे.विशेष म्हणजे, यंदा पहिल्यांदाच स्टेशन मास्टर भरती परीक्षा घेण्याची जबाबदारी RRB अजमेरकडे सोपवण्यात आली आहे. यापूर्वी हे पद NTPC भरती अंतर्गत भरले जात होते, मात्र यंदापासून ते NTPC कॅटेगरीतून वगळण्यात आले आहे.
वेतन किती मिळणार?
स्टेशन मास्टर पद हे ७ व्या वेतन आयोगानुसार लेव्हल-६ मध्ये येते. या पदासाठी सुरुवातीचा मूळ पगार ३५,४०० रुपये प्रति महिना असून इतर भत्तेही मिळणार आहेत.
वयोमर्यादा
या पदासाठी किमान वयोमर्यादा १८ वरून २० वर्षे करण्यात आली आहे, तर कमाल वयोमर्यादा ३० वर्षे कायम आहे.
अर्ज कसा करावा?
1. अधिकृत वेबसाईट http://rrbapply.gov.in ला भेट द्या.
2. स्टेशन मास्टर भरती (CEN 08/2026) लिंक ओपन करा.
3. रजिस्टर / लॉग इन करून माहिती भरा.
4. कागदपत्रे अपलोड करून शुल्क भरा आणि अर्ज सबमिट करा.
निवड प्रक्रिया: CBT परीक्षा, CBAT चाचणी, कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी या टप्प्यांद्वारे निवड होणार आहे.अर्जदाराचे आधार कार्डवरील नाव, वडिलांचे नाव आणि जन्मतारीख १० वीच्या प्रमाणपत्राशी जुळणे आवश्यक आहे.
konkansamwad 
