जिल्हा पतसंस्था फेडरेशनच्या मेळाव्यात 'स्नेह नागरी' पतसंस्थेचा गौरव
सावंतवाडी
सिंधुदुर्ग जिल्हा पतसंस्था फेडरेशनच्या वतीने आंबोली येथील सैनिक स्कूलमध्ये आयोजित मेळाव्यात सावंतवाडी येथील 'स्नेह नागरी सहकारी पतसंस्थे'ला त्यांनी सहकार क्षेत्रात केलेल्या उत्तम कार्याबद्दल स्मृतीचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले.हा सन्मान स्वीकारताना स्नेह नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष अनंत उचगावकर, मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. संगीता प्रभू, सौ. कोमल सावंत, कणकवली येथील सहाय्यक शाखा अधिकारी सौ. सुप्रिया गोवेकर आणि कुडाळ शाखेच्या सौ. नेहा साळवी उपस्थित होत्या.या कार्यक्रमाला फेडरेशनचे अध्यक्ष सुनील राऊत, अॅड. दीपक पटवर्धन, जिल्हा उपनिबंधक श्री. शिंदे, सैनिक पतसंस्थेचे अध्यक्ष श्री. कविटकर, फेडरेशनचे उपाध्यक्ष जॉय डॉन्टस आणि समीर वंजारी प्रामुख्याने उपस्थित होते.
konkansamwad 
