उत्कृष्ट शिक्षक पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल प्राजक्ता आपटे यांचा भाजपातर्फे सन्मान
वेंगुर्ला
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या ‘उत्कृष्ट शिक्षक’ पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल प्राजक्ता आपटे यांचा भारतीय जनता पार्टीच्या वतीने मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला. शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे.अध्यापनासोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचे यावेळी कौतुक करण्यात आले. शिक्षक म्हणून त्यांनी बजावलेली प्रभावी भूमिका आणि शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाची दखल म्हणून मिळालेला हा पुरस्कार त्यांच्या कार्याची महत्त्वपूर्ण पावती असल्याचे नगराध्यक्ष राजन गिरप यांनी यावेळी सांगितले.यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपटे मॅडम यांचे अभिनंदन करून, भविष्यातही शिक्षण क्षेत्रात असेच उल्लेखनीय कार्य करण्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.या सन्मान सोहळ्याला भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, वेंगुर्ला नगराध्यक्ष राजन गिरप, शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, नगरसेविका गौरी मराठे, नगरसेवक प्रशांत आपटे, नगरसेवक रविंद्र शिरसाट, वेताळ प्रतिष्ठानचे डॉ. सचिन परुळकर, प्रा. सदाशिव सणगर, संजय पुनाळेकर, दिनेश तानावडे आदी उपस्थित होते.
konkansamwad 
