कोतवाल पदासाठी इच्छुक उमेदवारांनी २५ ऑगस्ट पर्यंत अर्ज सादर करावेत. उपविभागीय अधिकारी सावंतवाडी यांचे आवाहन.

कोतवाल पदासाठी इच्छुक उमेदवारांनी २५ ऑगस्ट पर्यंत अर्ज सादर करावेत.  उपविभागीय अधिकारी सावंतवाडी यांचे आवाहन.

वेंगुर्ला.

   तहसीलदार सावंतवाडी वेंगुर्ला, दोडामार्ग यांचे आस्थापनेवरील खालील तलाठी सजा मधील कोतवालांची पदे भरण्यात येणार आहे त्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून या जाहीरनाम्याद्वारे दिनांक 25 ऑगस्ट 2023 रोजी सायंकाळी 6:15 वाजेपर्यंत अर्ज मागविण्यात येत आहे तरी इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करावेत असे आवाहन उपविभागीय अधिकारी सावंतवाडी यांच्याद्वारे करण्यात आले आहे.
   तहसील कार्यालय सावंतवाडी वेंगुर्ला व दोडामार्ग या तालुक्यातील रिक्त कोतवाल पदे भरणेसाठीचा अनुशेष खालील प्रमाणे आहे.
तहसीलदार कार्यालय सावंतवाडी-
मळगाव- (अनु.जाती. महिला), सांगेली- (अनु.जमाती), चौकुळ- (अनु.जमाती महिला), माडखोल - (भ.ज.ब),
तळवडे - (भ.ज.क.), कुणकेरी - (भ.ज.ड.), चराठे -(वि.मा.प्र.), सतार्डा -(इ.मा.व.), इन्सुली - (इ.मा.व.महिला), सावंतवाडी शहर -(इ.मा.व.), तळवणे - (इ.मा.व.), डेगवे - (इ.डब्लू.एस.महिला), निगुडे - (इ.डब्लू.एस.), असनिये -(अराखीव).

तहसीलदार कार्यालय वेंगुर्ला -
रेडी -(अनु.जमाती महिला), शिरोडा -(अनु.जमाती), तुळस -( वि.जा.अ), उभादांडा -(इ.डब्लू.एस.महिला), वेतोरे - (इ.डब्लू.एस.), परुळे -(अराखीव).

तहसीलदार कार्यालय दोडामार्ग -
पिकुळे -(अनु.जाती), तेरवण - मेढे -(अनु.जमाती महिला), आयनोडे - ( वि.जा.अ), साटेली- भेडशी -(इ.मा.व.महिला), वझरे - (इ.डब्लू.एस.).

  वरील प्रमाणे रिक्त सजातील कोतवाल भरती करण्याचे असून इच्छुक उमेदवाराकडून अध्यक्ष कोतवाल निवड समिती तथा उपविभागीय अधिकारी सावंतवाडी यांचे मार्फत जाहीरनामा प्रसिद्ध झाल्यापासून दिनांक 25 ऑगस्ट 2023 रोजी सायंकाळी 6:15 वाजेपर्यंत शासकीय सुट्टी वगळून कार्यालयीन वेळेत अर्ज मागविण्यात येत आहेत सदर तारखे नंतर येणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी याबाबत 25 ऑगस्ट 2023 पर्यंत प्राप्त झालेल्या अर्जांची छननी करून पात्र उमेदवारांची यादी दिनांक 29 ऑगस्ट रोजी संबंधित तहसीलदार कार्यालयाचे नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात येईल.पात्र उमेदवारांची लेखी परीक्षेचे ठिकाण उमेदवाराचे प्रवेश पत्रावर नमूद असेल तसेच या जाहीरनाम्याच्या प्रसिद्धीपूर्वी केलेल्या कोणत्याही अर्जाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी. तरी इच्छुक उमेदवारांनी कोतवाल पदासाठी अर्ज करावे असे आवाहन उपविभागीय अधिकारी सावंतवाडी यांनी केले आहे.
  कोतवाल पदासाठी करावयाच्या अर्जाचा नमुना दिनांक 14 ऑगस्ट 2023 पासून 25 ऑगस्ट 2023 पर्यंत शासकीय सुट्टी वगळून कार्यालयीन कामकाजाचे वेळेत संबंधित तहसीलदार कार्यालयात मधून अर्ज शुल्क रुपये 25 भरणा करून प्राप्त करून घेता येतील तसेच परिपूर्ण कागदपत्रांसह अर्ज दिनांक 25 ऑगस्ट 2023 रोजी सायंकाळी 6:15 वाजेपर्यंत स्वीकारले जातील याची नोंद घ्यावी.