रेडी येथे सप्ताहानिनित्त श्री. माऊली देवीचे व्याघ्रेश्वरी रूपात' दर्शन....जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहिकर यांनी घेतले दर्शन

रेडी येथे सप्ताहानिनित्त श्री. माऊली देवीचे व्याघ्रेश्वरी रूपात' दर्शन....जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहिकर यांनी घेतले दर्शन

वेंगुर्ले

 

       श्रावण शुद्ध दशमीनिमित्त कोकणची अंबा म्हणून ख्याती असलेल्या रेडी येथील श्री देवी माऊली देवस्थानच्या सप्तोत्सवाला भक्तिमय वातावरणात उत्साहात प्रारंभ झाला आहे. सप्तोत्सवाच्या चौथ्या दिवशी, रविवार दि. २३ ऑगस्ट रोजी श्री देवी माऊलीचे "व्याघ्नेश्वरी रूप" साकारण्यात आले. या रूपातील श्री देवी माऊलीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहिकर यांनी आज़ रेडी देवी माऊली सप्ताह उत्सवाला भेट देवून देवीचे दर्शन घेतले.यावेळी रेडी सरपंच रामसिंग राणे, माऊली देवस्थान विश्वस्त संदीप राणे, शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, पोलीस जाधव, पोलीस पाटील सीताराम राणे आणी अन्य मान्यवर उपस्थित होते.सप्तोत्सवानिमित्त देवस्थानात विविध धार्मिक कार्यक्रम, पूजा-अर्चा आणि अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून, परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. सात ही दिवस श्री देवी माऊलीच्या विविध रूपांतील दर्शनासाठी परिसरातील तसेच दूरवरून भाविक रेडी येथे दर्शनासाठी दाखल होत आहेत.