वेंगुर्ले शिवप्रेमी मित्रमंडळाच्या स्पर्धांचा निकाल जाहीर

वेंगुर्ले शिवप्रेमी मित्रमंडळाच्या स्पर्धांचा निकाल जाहीर

वेंगुर्ले

 

    वेंगुर्ले येथील माणिकचौक शिवप्रेमी मित्रमंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विविध सांस्कृतिक स्पर्धांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. दोन दिवस चाललेल्या या भरगच्च कार्यक्रमात वेशभूषा आणि रेकॉर्ड डान्स स्पर्धांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.वेशभूषा स्पर्धेत आद्या खापरे हिने उत्कृष्ट सादरीकरण करत प्रथम क्रमांक पटकावला, तर दोन गटांत झालेल्या रेकॉर्ड डान्स स्पर्धेत दूर्वा पावसकर व नंदिनी बिले आणि चैत्रा चव्हाण व वेलांकनी गोम्स यांनी प्रथम क्रमांकावर आपले नाव कोरले. या सोहळ्यात वेशभूषा स्पर्धेत आद्या खापरे प्रथम, अंतरा आडेलकर द्वितीय तर भूरे यांनी तृतीय क्रमांक मिळवला. आयुष आणि सोनाक्षी बागायतकर यांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली. रेकॉर्ड डान्सच्या मोठ्या गटात दूर्वा पावसकर व नंदिनी बिले (प्रथम), निरजा माडकर व वैष्णवी मुणनकर (द्वितीय), तर पूर्वा मेस्त्री व भास्कर सांगळे (तृतीय) यांनी यश मिळवले. लहान गटात चैत्रा चव्हाण व वेलांकनी गोम्स (प्रथम), वेदश्री दाभोलकर (द्वितीय) आणि गंश परब (तृतीय) यांनी बाजी मारली.सर्व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले. याच कार्यक्रमात सामाजिक व क्रीडा क्षेत्रात योगदान देणाऱ्या मान्यवरांचा विशेष सत्कार करण्यात आला. यामध्ये नगराध्यक्ष दिलीप गिरप, नगरसेविका अॅड. सुषमा प्रभूखानोलकर, जिल्हा परिषद सदस्य संजय गावडे, वृंदा गवंडळकर आणि दिव्यांग क्रिकेटपटू स्मिता गावडे यांचा समावेश होता. या प्रसंगी विविध संस्थांचे पदाधिकारी, नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्तेमोठ्या संख्येने उपस्थित होते. मंडळाचे अध्यक्ष रोहित वेंगुर्लेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी या स्पर्धांचे यशस्वी आयोजन केले असून बाबूराव खडपकर यांनी सूत्रसंचालन केले.