हुमरमळा-वालावल येथे रामनवमीचे औचित्य साधून विकासकामांचे भूमिपूजन

हुमरमळा-वालावल येथे रामनवमीचे औचित्य साधून विकासकामांचे भूमिपूजन

 

कुडाळ

 

   तालुक्यातील हुमरमळा (वालावल) गावातील विकासकामांची भूमिपूजने रामनवमी उत्सवाचे औचित्य साधून मोठ्या उत्साहात करण्यात आली. हुमरमळा-वालावल गावातील विकासकामांचा ओघ सातत्याने सुरू असून माजी पंचायत समिती सदस्य अतुल बंगे यांच्या नेतृत्वाखाली या ग्रामपंचायतीने मोठा विकासनिधी आणला आहे. याच निधीतून पंचायत समिती सदस्या अर्चना बंगे, सरपंच अमृत देसाई, उपसरपंच, रश्मी वालावलकर, संजना गुंजकर, हेमांगी कद्रेकर आणि मितेश वालावलकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून विविध विकासकामांची भूमिपूजने करण्यात आली.यामध्ये प्रामुख्याने हुमरमळा परकरवाडी पायवाट, हुमरमळा परकरवाडी गणेश घाट, श्री रामेश्वर मंदिराकडून रस्ता गटार बांधकाम आणि हुमरमळा पडोसवाडी गणेश घाट सुशोभीकरण या महत्त्वाच्या कामांचा समावेश आहे. ग्रामअधिकारी श्रीम. अपर्णा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतीचा प्रशासकीय कारभार अत्यंत पारदर्शकपणे सुरू असून गावाच्या विकासाची घोडदौड वेगाने सुरू आहे.या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी माजी ग्रामपंचायत सदस्य कांता माड्ये, प्रभाकर गुंजकर, हेमंत कद्रेकर, नरो पेडणेकर, शानो परकर, दीनेश परकर, माजी ग्रामपंचायत सदस्य भिवा गुंजकर, ओमकार गुंजकर, सुजाता गुंजकर, गुरु परब, सागर परकर, पोलीस पाटील उमेश शृंगारे, हेमंत केसरकर, जितू सावंत, पंकज माड्ये, पप्पू दळवी, विजय कानडे, दादा परकर, लक्ष्मण खरात, श्रीम. सुलभा गुंजकर आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.