मालवण येथे आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

मालवण
महसूल सप्ताहाच्या निमित्ताने येथील मालवण तहसिल कार्यालयात तहसिलदार वर्षा झालटे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिरात महसूलच्या कर्मचाऱ्यांसह पोलीस अधिकारी, कर्मचारी यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.या शिबिरामध्ये आरोग्य विभागामार्फत आयुष्यमान कार्ड, आभा कार्ड काढण्याबाबत आरोग्य मित्र संकेत जाधव यांनी मार्गदर्शन केले. या शिबिरामध्ये महसूल विभागाचे नायब तहसिलदार निलिमा प्रभुदेसाई, संजय गांधी योजना विभागाच्या नायब तहसिलदार प्रिया हर्णे यांच्यासह अन्य अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते. वैद्यकीय अधिकारी डॉ. जागृती ढोके, आरोग्य निरीक्षक व्ही. पी. सावंत, एस. ए. चांदोसकर, आर. बी. साखरे, श्रीमती वेंगुर्लेकर, श्रीमती तेली, श्री. कोटे हे उपस्थित होते.