मालगुंड समुद्रकिनारी सापडला मृतावस्थेतील व्हेल मासा

मालगुंड समुद्रकिनारी सापडला मृतावस्थेतील व्हेल मासा

 

रत्नागिरी

 

        रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे नजीकच्या मालगुंड येथील गायवाडी समुद्रकिनारी भला मोठा व्हेल मासा मृतावस्थेत आढळला. काही दिवसांपूर्वीच या माशाचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. समुद्राच्या लाटांबरोबर वाहत आलेला हा मासा समुद्रकिनाऱ्यावर पोहोचला. मात्र, तो प्रचंड मोठा असल्याने लाटांमध्ये अडकून राहिला. समुद्राची ओहोटी सुरू झाल्यानंतर या माशाचा मृतदेह समुद्रकिनाऱ्यावरील स्थानिक व्यावसायिक तसेच ग्रामस्थांच्या निदर्शनास आले.या घटनेची माहिती स्थानिक व्यावसायिक व ग्रामस्थांनी गणपतीपुळे पोलिस चौकीला दिली. या घटनेची माहिती मिळताच गणपतीपुळे पोलीस चौकीचे सहायक पोलीस निरीक्षक गावीत, हेडकॉन्स्टेबल भागवत व त्यांचे सहकारी तसेच वनक्षेत्रपाल किरण ठाकूर, वनरक्षक आकाश कडू, प्राजक्ता चव्हाण, शुभम भाटकर, प्रकल्प समन्वयक पशुधन पर्यवेक्षक नीलेश वाघमारे आणि कासव मित्र आदर्श मयेकर (मालगुंड) यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मृत मासा किनाऱ्यावरून बाहेर काढण्यासाठी पोलीस व वन विभागाचे कर्मचारी आणि स्थानिक व्यावसायिक, ग्रामस्थांनी एकत्रितपणे मदत केली.