विशाल परब यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संदीप गावडे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

विशाल परब यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संदीप गावडे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

सावंतवाडी

     
     भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे निकटवर्तीय भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष तथा तळवडे जिल्हा परिषद सदस्य संदीप गावडे यांचा वाढदिवस सावंतवाडी येथील भाजपा जनसंपर्क कार्यालयात अत्यंत उत्साहात महाराष्ट्र भाजपा युवानेते विशाल परब यांच्या प्रमुख उपस्थितीत हा वाढदिवस सोहळा संपन्न झाला.या प्रसंगी विविध लोकप्रतिनिधी, भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून संदीप गावडे यांना उदंड आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या. या सोहळ्याला सावंतवाडीचे उपनगराध्यक्ष अॅड. अनिल निरवडेकर, भाजपा नेते विनोद राऊळ, कोलगाव जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा नितीन राऊळ यांची विशेष उपस्थिती होती. तसेच वेंगुर्ला भाजपा तालुकाध्यक्ष पप्पू परब, कलंबिस्त पंचायत समिती सदस्य प्रथमेश सावंत, दोडामार्ग माजी तालुकाध्यक्ष रंगनाथ गवस, सावंतवाडी मंडल युवामोर्चा अध्यक्ष हितेन नाईक, आंबोली मंडल युवामोर्चा अध्यक्ष विनेश तावडे, वेंगुर्ला नगरसेवक तथा सभापती सचिन शेट्ये, सावंतवाडी माजी नगरसेवक राजू बेग, कास सरपंच प्रवीण पंडित आणि मळगाव माजी सरपंच निलेश कुडव यांनीही उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.या सोहळ्यास शिरीष नाईक, सावंतवाडी मंडल चिटणीस धीरेंद्र म्हापसेकर, संतोष बिले, पुंडलिक कदम, सायमन आल्मेडा, समीर कुडाळकर, विजय रेडकर, योगेश नाईक, हेमंत गावडे, प्रशांत नाईक आणि मारुती दोडशानटी यांच्यासह इतर अनेक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.