जागतिक योग दिनानिमित्त देवगड येथे योग प्रात्यक्षिक शिबिर

देवगड
जागतिक योग दिनानिमित्त आज मोरेश्वर जनार्दन गोगटे सांस्कृतिक भवन येथे भारतीय जनता पार्टी देवगड मंडल आणि विद्या विकास मंडळ, जामसंडे यांच्या संयुक्त विद्यमाने योग प्रशिक्षण आणि प्रात्यक्षिक शिबिराचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाचे उद्घाटन माजी आमदार अजितराव गोगटे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. याप्रसंगी भाजपा देवगड मंडळाचे उपाध्यक्ष बाळ खडपे, कार्यक्रमाच्या संयोजिका आणि उपाध्यक्षा प्रियांका साळसकर, अध्यक्ष राजा भुजबळ, महिला अध्यक्षा उषःकला केळुसकर, गटनेता शरद ठुकरूल, नगरसेविका तन्वी चांदोस्कर, योगेश चांदोस्कर, दया पाटील, सहसंयोजक वैभव करंगुटकर, मृणालिनी भडसाळे, योग प्रशिक्षिका सौ. खाडीलकर, सौ. काटदरे, मुख्याध्यापक सुनील जाधव तसेच विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या शिबिरात योगाचे महत्त्व, त्याचे शारीरिक व मानसिक फायदे याबाबत माहिती देण्यात आली. उपस्थित विद्यार्थ्यांनी योग प्रात्यक्षिकात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.