वेंगुर्ला परुळे येथे वडाचे झाड पडून घराचे नुकसान

वेंगुर्ला
मुसळधार पावसामुळे वेंगुर्ला तालुक्यातील परुळे सुतारवाडी येथील कृष्णा भिवा मेस्त्री यांच्या घरावर जुने वडाचे झाड उन्मळून घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मेस्त्री यांच्या घराच्या माडीवर मुंबईहून आलेली पाहुणे मंडळी झोपत असत मात्र ही घटना घडली त्याचदिवशी संध्याकाळी पाहुणे मुंबईला गेल्याने बचावली.यावेळी सरपंच प्रणिती आंबडपालकर, माजी सभापती निलेश सामंत, उपसरपंच संजय दुधवडकर, सदस्य प्रदीप प्रभू, प्राजक्ता पाटकर, सीमा सावंत तसेच प्रसाद पाटकर यांनी अपघातस्थळी भेट देत पाहणी केली. ग्राममहसूल अधिकारी आर.आर. गवते, कोतवाल स्वप्निल वरक यांनी नुकसानग्रस्तांची पाहणी करून नुकसानीचा पंचनामा केला. यावेळी माजी सभापती निलेश सामंत यांनी कृष्णा मेस्त्री यांना १०,००० रुपयांची तात्काळ मदत केली.