आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या पाठपुराव्याला यश......रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर, ठाणे जिल्ह्यातील उर्वरित शिक्षकांचा येत्या आठवड्यात होणार पगार!
सिंधुदुर्ग
कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर, ठाणे जिल्ह्यातील अंशतः अनुदानित शिक्षकांचे पगार निधी अभावी खोळंबले आहेत. जिल्हा वेतन अधीक्षक यांनी मागणी करून देखील शिक्षण संचालक कार्यालय पुणे,येथून निधी उपलब्ध करून दिला गेला नसल्याने,शिक्षकांचे पगार थांबले होते.ही स्थिती गेले तीन महिने सतत होत असल्याने ,शिक्षकांचे कैवारी आणि प्रत्येक अडचणीत संकटमोचक म्हणून उभे राहणाऱ्या आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी ह्या विषययावर अधिकारी वर्गाला चांगलेच धारेवर धरले. शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांच्याशी शिक्षकांमध्ये असलेल्या असंतोषाची जाणीव करून दिली. आपण हा शिक्षकांचा प्रश्न् तात्काळ नं मिटवल्यास अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा विषय घेत असल्याचे सांगितले.अधिकाऱ्यांकडून होत असलेल्या कामातील हलगर्जीपणा विषयी चांगलीच कान उघडणी केली.पगाराविना शिक्षकांची होणारी परवड निदर्शनास आणून दिली.सर्व् स्तरावर वेगाने सूत्र हलवल्यावर अखेर पुणेहून श्री डहाळे यांचा फोन आमदार म्हात्रे यांना आला.पाचही जिल्ह्यातील किती निधी कमी पडत आहे?याची आम्ही तात्काळ माहिती घेतली आहे.सोमवारी निधी प्रत्येक जिल्ह्याला पोहचेल व मंगळवारला शिक्षकांचे पगार अदा होतील् असा शब्द दिला.म्हात्रे यांच्या या यशस्वी पाठपुराव्यामुळे शिक्षकांनी आ.ज्ञानेश्वर म्हात्रे यांचेआभार मानले आहेत.

konkansamwad 
