तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत सोहम देशमुखचे यश.

सावंतवाडी.
जागतिक बुद्धिबळ दिनानिमित्त आयोजित तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या कु.सोहम देशमुखची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या स्पर्धेत सावंतवाडी तालुक्यातील ४० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. सोहमच्या या यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. प्राची साळगावकर व प्रशालेचे संस्थापक रुजुल पाटणकर यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.