परुळेत 21 जानेवारीपासून दशावतार नाट्यमहोत्सव.

परुळेत 21 जानेवारीपासून दशावतार नाट्यमहोत्सव.


परुळे
     संस्कृती कला प्रतिष्ठान परुळे आणि श्री देव आदिनारायण देवस्थान परुळे आयोजित कै. शामसुंदर श्रीपाद सामंत स्मृति १६ वा. दशावतारी नाट्य महोत्सव २०२५ दिनांक २१ ते ३० जानेवारी दरम्यान आदिनारायण मंदिराच्या रंगमंचावर संपन्न होणार आहे. मंगळवार दि. २१ जानेवारी २०२५ रोजी सायं ६.३० वाजता उ‌द्घाटक उद्योजक दत्ता सामंत  यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. यावेळी राजापूर चे आमदार किरण उर्फ भैय्या सामंत, महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे अध्यक्ष ॲड.संग्राम देसाई उपस्थित राहणार आहेत सत्कारमूर्ती भास्कर उर्फ भाई सामंत यांना कै. वसंत परुळेकर स्मृती पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
     त्यानंतर सायं. ०७.३० वा. वावळेश्वर दशावतार नाट्यमंडळ यांचे "पंचमुखी हनुमान"दि. २२ जानेवारी सायं. ०७.३० वा.कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ (कै. सुधीर कलिंगण) यांचे "शतग्रीव संहार", दि. २३ जानेवारी सायं. ०७.३० वा. वालावलकर दशावतार नाट्यमंडळ यांचे "प्रचंड भैरव", दि. २४ जानेवारी सायं. ०७.३० वा. बाळकृष्ण गोरे दशावतार नाट्यमंडळ यांचे "भक्त पुंडलीक" दि. २५ जानेवारी सायं. ०७.३० वा. नाईक मोचेमाडकर दशावतार नाटयमंडळ यांचे "पुर्वीचा रितकारी" दि. २६ जानेवारी सायं. ०७.३० वा. खानोलकर दशावतार नाट्यमंडळ यांचे "लग्राआधी बाप" दि. २७ जानेवारी सायं. ०७.३० वा. पार्सेकर दशावतार नाट्यमंडळ यांचे "बर्बरी" दि. २८ जानेवारी सायं. ०७.३० वा.दत्त माऊली दशावतार नाट्यमंडळ यांचे "मयुरेश्वर" दि. २९ जानेवारी सायं. ०७.३० वा.जय हनुमान दशावतार महानगर पालिका "नारायणी नमोस्तुते" दि. ३० जानेवारी सायं. ०७.३० वा.देवेंद्र नाईक प्रस्तुत चेंदवणकर दशावतार नाट्यमंडळ यांचे "शिवभक्त शबर" आदि नाट्य प्रयोग सादर होणार आहेत, तरी या महोत्सवाचा लाभ रसिक प्रेक्षकांनी घ्यावा असे आवाहन संस्कृती प्रतिष्ठान तर्फे करण्यात आले आहे.