किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याला सुरूवात; हजारो शिवप्रेमींची उपस्थिती.

किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याला सुरूवात; हजारो शिवप्रेमींची उपस्थिती.

रायगड.

   महाराष्ट्राचे आराध्यदैवत म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना ओळखले जाते. छत्रपती शिवाजी महाराजांचा आज ३५१ वा शिवराज्यभिषेक सोहळा आहे. यानिमित्त स्वराजाची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक साजरा केला जात आहे.
  छत्रपती शिवाजी महाराजांनी जनतेला स्वराज्य मिळवून दिले. ६ जून १६७४ रोजी शिवाजी महारांजाचा राज्यभिषेक सोहळा झाला. त्यानंतर हिंदवी स्वराज्याची सुरुवात झाली. हा ऐतिहासिक दिवस साजरा करण्यासाठी दरवर्षी रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जातो. आज रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जात आहे. फुलांची आरास, ढोल-ताशे, मर्दानी खेळ असे कार्यक्रम आज रायगडावर होणार आहे. रायगडावरील हा सोहळा खूप सुंदर पद्धतीने साजरा केला जातो.
   दोन दिवस साजरा होणाऱ्या या कार्यक्रमाला शिवप्रेमींनी खूप मोठ्या संख्येने गर्दी केली आहे. काल संध्याकाळी रायगडावर देव-देवतांचे पूजन, मर्दानी खेळांनी सोहळ्याला सुरुवात झाली. आज संपूर्ण दिवस रायगडावर वेगवेगळे कार्यक्रम पार पडणार आहे. यासाठी रायगडावर फुलांची आरास करुन सजावट करण्यात आली. रायगडावर शिवप्रेमींनी पारंपारिक वेशभूषा करुन गर्दी केली आहे. या सोहळ्याला छत्रपती संभाजी महाराज, मनोज जरांगे पाटील राहणार आहेत. तर रोहित पवार आता रायगडावर उपस्थित झाले आहेत.