परुळे येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नव्या इमारतीची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

परुळे येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नव्या इमारतीची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

परुळे

 

  परुळे येथील कुशेवाडा ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नव्या इमारतीच्या कामाची पाहणी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे तसेच जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांनी प्रत्यक्ष भेट देऊन केली. यावेळी त्यांनी कामाचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. कुशेवाडा ग्रामपंचायत हद्दीत प्राथमिक आरोग्य केंद्राला अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नवीन इमारतीचे काम शासनाच्या योजनेअंतर्गत मंजूर झाले असून त्याचे काम सध्या सुरू आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने भेट देत कामाची स्थिती तपासली.या पाहणीवेळी प्रकल्प संचालक उदय पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत बुधवले, कार्यकारी अभियंता राजेंद्र सावंत, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी, उपअभियंता सुहास टेमकर आदी उपस्थित होते.तसेच कुशेवाडा ग्रामपंचायतीचे सरपंच निलेश सामंत, उपसरपंच महादेव सापळे, सदस्य गणपत माधव, प्रकाश राणे, ग्रामपंचायत अधिकारी आनंद परुळेकर तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी सरपंच निलेश सामंत यांनी मान्यवरांचे स्वागत केले.