शिरोडा येथे श्रीराम जन्मभूमी मंदिर मंत्राक्षता मंगल कलश यात्रेची शोभायात्रा संपन्न.

शिरोडा येथे श्रीराम जन्मभूमी मंदिर मंत्राक्षता मंगल कलश यात्रेची शोभायात्रा संपन्न.

वेंगुर्ला.

अयोध्या येथे श्री राम मंदिर येथे प्राणप्रतिष्ठापना सोहळा दि.२२ जानेवारी २०२४ रोजी साजरा होत आहे या निमित्त संपूर्ण देशामध्ये अयोध्या मधून आलेल्या मंत्राक्षता यांचे पूजन करुन व्यापक गृह संपर्क अभियानांतर्गत रामसेवक घरोघरी जाऊन मंत्राक्षता, फोटो, पत्रक यांचे घरोघरी वितरण करुन त्या मंत्राक्षता देव घरात ठेऊन प्राणप्रतिष्ठान वेळी घरातील देवाला अर्पण करण्यासाठी आवाहन करत आहे.या अभियानाचा शुभारंभ करण्यासाठी शिरोडा पंचक्रोशीतील सर्व पक्षीय, सर्व संप्रदाय, मंडळ, लोकप्रतिनिधी, रामभक्त, हिंदुधर्माभिमानी, यांनी एकत्र येऊन आज गुरूवार दि.४ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत श्री मारुती मंदिर शिरोडा बाजारपेठ ते शिरोडा एस् टी स्टॅण्ड बायपास रोड ते अ.वि.बावडेकर हायस्कूल ते श्री देवी माऊली मंदिर शिरोडा पर्यत पायी चालत मंत्राक्षता मंगल कलश यात्रेची पालखी घेऊन श्रीराम जय राम जय जय राम जप करत, राम नामाची घोषणा करत शोभायात्रा काढण्यात आली.
    या मंत्राक्षता मंगल कलशाचे पूजन कारसेवक कृष्णा शिरोडकर, गुरुनाथ परब यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी वेंगुर्ला तालुका संघचालक विनायक खवणेकर व विश्व हिंदू परिषद प्रमुख सिंधुदूर्ग जिल्हा सहमंत्री विष्णू खोबरेकर, यांनी या अभियानाची माहिती श्री मारुती मंदिर व श्री माऊली मंदिर येथे उपस्थित रामभक्तांना दिली या शोभायात्रेत कु.आराध्य उगवेकर(श्रीराम), कु.निलराज पडवळ(हनुमान), छोटया दोन लहान मुलांची वेषभूषा विशेष आकर्षक ठरली ही शोभायात्रा श्री देवी माऊली मंदिरामध्ये गेल्यानंतर पाच गावकार यांच्या उपस्थितीत कारसेवक गुरुनाथ परब व या अभियांनाचे शिरोडा मंडल प्रमुख, उपप्रमुख, मंदार परांजपे, विकास शेटये यांनी श्री देवी माऊली चरणी मंत्राक्षता व निमंत्रण पत्रिका,फोटो, अर्पण करुन व्यापक गृह संपर्क अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.
  सर्वाच्या सहकार्याने ही शोभायात्रा संपन्न झाली या मध्ये रामभक्त,धर्माभिमानी महिला,पुरुष यांनी सहभाग घेतला व हि शोभायात्राचे ठिक ठिकाणी ग्रामस्था कडून पंचारती ओवळून फुले अर्पण करुन औक्षण करण्यात आले ठिक ठिकाणी रांगोळी काढून उत्साहात  स्वागत करण्यात आले.