तुळस येथे १५ ऑक्टोबर रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन.

वेंगुर्ला.
वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस, छत्रपती मित्र मंडळ, तुळस व सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान शाखा वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने आणि रक्तपेढी सावंतवाडी यांच्या सहकार्याने रविवार दि. १५ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी ९.०० वा. श्रीमंत पार्वतीदेवी वाचनालय, तुळस (तुळस श्रीदेव जैतिराश्रित संस्था मुंबई, बहुउद्देशीय सभागृह) येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
सद्यस्थितीत जिल्ह्यात रक्ताची गरज लक्षात घेऊन सलग २३ व्या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी रक्तदान शिबिरास उपस्थित राहून इच्छुक रक्तदात्यांनी रक्तदान करून सहकार्य करावे तसेच नावनोंदणी व अधिक माहितीसाठी महेश राऊळ (९५०५९३३९१२) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन प्रतिष्ठान चे अध्यक्ष विवेक तिरोडकर आणि छत्रपती मंडळ चे अध्यक्ष अवधूत मराठे यांच्या वतीने करण्यात आले आहे.