समाजाच्या हितासाठी नव्हे, तर स्वार्थासाठी आमदार गोपीचंद पडळकर कोकणात : सुशांत शेळके.

समाजाच्या हितासाठी नव्हे, तर स्वार्थासाठी आमदार गोपीचंद पडळकर कोकणात : सुशांत शेळके.

सिंधुदुर्ग.

   आमदार गोपीचंद पडळकर हे कोकणात आल्यानंतर धनगर समाज युवा नेता सुशांतदादा शेळके यांनी त्यांच्यावर टिका केली. श्री. शेळके यांनी म्हटले आहे की, आमदार गोपीचंद पडळकर हे हेलिकॉप्टर ने दिखाव्यासाठी फिरत आहेत. समाजाच्या पाठिंब्यामुळे विधानपरिषद मिळाली. सदनामध्ये समाजाचा प्रश्न प्रत्येक अधिवेशनात मांडायचा सोडून रस्त्यावर फिरत आहेत. धनगर समाजाच्या डोळ्यात धूळफेक करत आहेत. चौंडीमधल्या उपोषणाला गोपीचंद पडळकर का गेले नाही? धनगर समाजाच्या हितासाठी नव्हे, तर धनगर समाज आपल्या मागे उभा आहे की नाही ही चाचपणी करण्यासाठी गोपीचंद पडळकर फिरत आहेत. अशी टीका धनगर समाज युवा नेता सुशांत शेळके यांनी केली आहे.