चारचाकी वाहनाची दुचाकीला जोरदार धडक.....धडकेत दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

चारचाकी वाहनाची दुचाकीला जोरदार धडक.....धडकेत दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

 

मालवण

 

          मालवण-कसाल मुख्य मार्गावरील कुंभारमाठ येथे एका भरधाव चारचाकी वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत दुचाकीस्वार तरुण जागीच ठार झाला.मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, कुंभारमाठ परिसरातून दुचाकीस्वार जात असताना समोरून येणाऱ्या चारचाकी वाहनाने त्याला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दुचाकीवरील तरुण युवकाला गंभीर दुखापत झाल्यामुळे जागीच मृत्यू झाला.अपघाताचा आवाज ऐकताच परिसरातील नागरिक मदतीसाठी धावून आले. घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते. पंचनामा करण्याची प्रक्रिया करून पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला. हा अपघात नेमका कशामुळे झाला आणि संबंधित चारचाकी वाहन कोणाचे होते, याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.