माडखोल येथील पावणाई दुग्ध संस्थेचा शेतकरी सन्मान उपक्रम

माडखोल येथील पावणाई दुग्ध संस्थेचा शेतकरी सन्मान उपक्रम

 

माडखोल

 

   श्री देवी पावणाई दुग्ध उत्पादक सहकारी संस्थेच्यावतीने दिवाळी निमित्त दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना दर फरकाच्या रकमेसह भेटवस्तूचे वितरण संस्थेच्या कार्यालयात करण्यात आले.
       कार्यक्रमास माजी सरपंच राजन राऊळ, उद्योजक रवींद्र राऊळ, माडखोल सोसायटीचे माजी व्हाईस चेअरमन प्रकाश नाईक, संस्थेचे चेअरमन ॲड. सुरेश आडेलकर, व्हॉईस चेअरमन संदीप येडगे, संचालक व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
      सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात सर्वाधिक दूध उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये संपत शंकर नाईक, विलासिनी विलास पोकळे आणि लवू धोंडू येडगे यांना अनुक्रमे ₹५००१, ₹३००१ आणि ₹२००१ रोख पारितोषिक, शाल आणि श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.
        तसेच संस्थेसाठी गेली आठ वर्षे जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल चंद्रकांत माडखोलकर, तसेच संगीत क्षेत्रात उदयास आलेल्या भजनी बुवा सुदेश गावडे यांचाही सत्कार करण्यात आला.
      या प्रसंगी ॲड. सुरेश आडेलकर म्हणाले की, “शेतकऱ्यांच्या मेहनतीमुळे आणि पारदर्शक व्यवहारांमुळे संस्था प्रगतीच्या मार्गावर आहे. ‘गोकुळ’ संघाच्या सहकार्यामुळे डेअरी आणि शेतकरी यांच्यात विश्वासाचे नाते निर्माण झाले आहे.”
        कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक करून, दरवर्षी शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या दिवाळी भेटवस्तू हा संस्थेचा स्तुत्य उपक्रम असल्याचे सांगितले.