सावंतवाडीच्या सोहम चौधरीचे जेईई मेन्समध्ये दैदिप्यमान यश

सावंतवाडीच्या सोहम चौधरीचे जेईई मेन्समध्ये दैदिप्यमान यश

सावंतवाडी


     येथील सिंधुदुर्ग सैनिक स्कूलचा इयत्ता 12 वीचा विद्यार्थी सोहम चौधरी याने नॅशनल टेस्टिंग एजन्सीमार्फत आयोजित ‘जेईई मेन्स’ परीक्षेत 92.56 पर्सेंटाईल मिळवून दैदिप्यमान यश संपादन केले आहे.  या यशाच्या जोरावर सोहम आता ‘जेईई अ‍ॅडव्हान्स’ परीक्षेसाठी पात्र ठरला असून, ही परीक्षा उत्तीर्ण होऊन तो आयआयटी सारख्या देशातील प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थेत प्रवेश मिळवू शकणार आहे.सैनिक स्कूलच्या शिक्षक आणि प्राध्यापकांचे मोलाचे मार्गदर्शन सोहमला लाभले. त्याच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष सुनील राऊळ, सचिव जॉय डॉन्टस, कार्यालयीन सचिव दीपक राऊळ, प्राचार्य नितीन गावडे तसेच संचालक मंडळ आणि शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्याचे विशेष अभिनंदन केले आहे.शाळेच्यावतीने सोहमच्या पुढील वाटचालीस आणि ‘JEE अ‍ॅडव्हान्स’ परीक्षेसाठी भरभरून शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. त्याच्या या कामगिरीमुळे सिंधुदुर्ग सैनिक स्कूलच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे.