विविध उपक्रमांनी साजरा होणार माजी आमदार परशुराम उपरकर यांचा वाढदिवस 

विविध उपक्रमांनी साजरा होणार माजी आमदार परशुराम उपरकर यांचा वाढदिवस 

 

सावंतवाडी


      शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते तथा माजी आमदार परशुराम उर्फ जीजी उपरकर यांचा वाढदिवस १४ एप्रिल रोजी विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा होणार असून, त्यानिमित्ताने सावंतवाडी आणि वेंगुर्ला परिसरात सलग पाच दिवसांच्या कार्यक्रमांचे आयोजन पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही आश्रमातील मुलांसोबत केक कापून व त्यांना स्नेहभोजन देऊन वाढदिवस साजरा केला जाणार आहे. तसेच, या पाच दिवसांत 'माजी आमदार उपरकर चषक' ही क्रीडा स्पर्धा आणि छत्रपती शिवाजी महाराज काळातील 'इतिहासकालीन शस्त्र प्रदर्शन' हे विशेष आकर्षण असणार आहे. याशिवाय, तज्ज्ञ डॉक्टरांद्वारे मोफत आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात आली असून विविध आरोग्य केंद्रांमध्ये रुग्णांना फळ वाटप कार्यक्रम घेण्यात येणार आहे. या सर्व उपक्रमांची माहिती युवासेना तालुकाप्रमुख तथा सावंतवाडी शहर प्रवक्ते आशिष सुभेदार आणि युवा पदाधिकारी आबा चिपकर यांनी दिली आहे.