सत्ताधिकाऱ्यांना जाग आणण्यासाठी आता सावंतवाडीकरांनी मोर्चा काढावा
सावंतवाडी
कारिवडे डंम्पींग ग्राउंड कचरा तसेच शहरातील अन्य प्रश्नाबाबत सुशेगाद असणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आता सावंतवाडीकरांनी मोर्चा काढावा, अशी भूमिका आज येथे आयोजित पत्रकार परिषदे दरम्यान नगरसेवक तथा जिल्हाप्रमुख संजू परब यांनी मांडली. आपण कारिवडे येथील कचऱ्या प्रश्नी आक्रमक भूमिका घेतली होती. त्या कचऱ्याबाबत काहीही झाले नाही, तर डम्पिंग ग्रांउडवरचा कचरा जैसे थे आहे. याबाबत श्री. परब यांना पत्रकार परिषदेत छेडले असतात त्यांनी ही भूमिका मांडली. यावेळी ते म्हणाले, लोकांच्या प्रश्नासाठी आम्ही कायम आवाज उठवत आहोत. परंतू सत्ताधाऱ्यांना त्याचे कोणतेही सोयरसुतक नाही. त्यामुळे आता त्यांना जाग आणण्यासाठी नागरीकांनीच मोर्चा काढावा, असे आवाहन त्यांनी केले. नळपाणी योजनेच्या कामाबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले, सक्षम अधिकारी नसल्यामुळे या योजनेचे काम निकृष्ठ दर्जाच होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ते काम थांबविण्याची मागणी आपण केली होती. त्यानुसार काम थांबविण्यात आले आहे. पुढील कार्यवाही होई पर्यंत हे काम होणार नाही. खणलेले रस्ते पुर्ववत करुन घेण्यासाठी आमचा पाठपुरावा सुरू आहे. त्यासाठी खडीकरण करण्यासाठी आवश्यक तो निधी मंजूर करण्यात आला आहे. भटक्या कुत्र्या पासून होणारे हल्ल्याचे प्रमाण गंभीर आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी शेल्टर हाउस उभारण्यात आले आहेत. त्यामुळे हा प्रश्न आता सुटेल, असा विश्वास परब यांनी व्यक्त केला.
konkansamwad 
