भारत-न्यूझीलंड टी २० वर्ल्डकप फायनल आज... टीम इंडियाला इतिहास रचण्याची संधी
अहमदाबाद
नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये आयसीसी टी २० वर्ल्डकप फायनलचा ऐतिहासिक सामना खेळवला जाणार आहे. भारतीय संघ सलग दुसऱ्या जेतेपदासाठी सज्ज झाला आहे. तर न्यूझीलंड संघाची नजर पहिल्या ट्रॉफीवर असेल. सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७:०० वाजता सुरू होईल. विशेष म्हणजे, फायनलमध्ये नाणेफेकीचा कौल आणि खेळपट्टीचा अंदाज महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील संघ रविवारी टॉफीवर लक्ष केंद्रित करेल. जर टीम इंडियाने विजेतेपद जिंकले तर ते तीन वेळा टी-२० विश्वचषक जिंकणारा पहिला संघ ठरेल. भारताने २००७ मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली आणि २०२४ मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टी-२० विश्वचषक जिंकला होता. दुसरीकडे, २०२१ मध्ये किवीज संघ अंतिम फेरीत पोहोचला होता, परंतु ऑस्ट्रेलियाने त्यांचे विजेतेपद जिंकण्याचे स्वप्न भंग केले. यामुळे आपले पहिले वाहिले जेतेपद मिळवण्यासाठी किवीज संघ शर्थीचे प्रयत्न करेल, यात शंकाच नाही.

konkansamwad 
