१६ ऑगस्टपूर्वी सिंधुदुर्गातील एलपीजी ग्राहकांनी ई-केवायसी पूर्ण करावी

१६ ऑगस्टपूर्वी सिंधुदुर्गातील एलपीजी ग्राहकांनी ई-केवायसी पूर्ण करावी

सिंधुदुर्ग

 

     सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व घरगुती एलपीजी ग्राहकांनी आपली ई-केवायसी प्रक्रिया 16 ऑगस्ट 2026 पूर्वी पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.जिल्ह्यातील ग्राहकांनी आपल्या संबंधित गॅस वितरकाशी संपर्क साधून किंवा संबंधित तेल विपणन कंपनीच्या अधिकृत मोबाईल ॲपद्वारे ई-केवायसी करावी. त्यासाठी एचपीसीएल ग्राहकांनी 'HP Pay', बीपीसीएल ग्राहकांनी 'Hello BPCL', तर आयओसीएल ग्राहकांनी 'IndianOil ONE' या अधिकृत ॲपचा वापर करावा.निर्धारित मुदतीत ई-केवायसी पूर्ण न झाल्यास तेल विपणन कंपन्यांच्या नियमांनुसार ग्राहकांना घरगुती दराने एलपीजी सिलिंडरचा लाभ मिळण्यास अडचणी निर्माण होऊ शकतात.त्यामुळे सर्व एलपीजी ग्राहकांनी 16 ऑगस्ट 2026 पूर्वी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी विजय सहारे यांनी केले आहे.