रस्ते दुरुस्तीच्या कामांची सावंतवाडी  नगराध्यक्षांकडून प्रत्यक्ष पाहणी 

रस्ते दुरुस्तीच्या कामांची सावंतवाडी  नगराध्यक्षांकडून प्रत्यक्ष पाहणी 

सावंतवाडी

    
      सावंतवाडी शहरात सुरू असलेल्या रस्ते दुरुस्तीच्या कामांची नगराध्यक्षा श्रद्धाराजे सावंत भोंसले यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली.शहरातील मोरडोंगरी, लक्ष्मीनगर आणि तहसीलदार रोड परिसरात सध्या सुरू असलेल्या वॉटर पाईपलाईन तसेच गॅस पाईपलाईनच्या कामांनंतरच्या रस्ते दुरुस्तीच्या कामांचा त्यांनी आढावा घेतला.पाईपलाईनच्या कामांमुळे खोदण्यात आलेल्या रस्त्यांची दुरुस्ती योग्य पद्धतीने आणि दर्जेदार व्हावी, जेणेकरून नागरिकांना वाहतुकीचा किंवा पावसाळ्यात चिखलाचा त्रास होऊ नये, यासाठी नगराध्यक्षांनी कंत्राटदार आणि संबंधित अधिकाऱ्यांना कामाचा दर्जा राखण्याचे आणि ती वेळेत पूर्ण करण्याचे कडक आदेश दिले.या पाहणी दौऱ्यावेळी महिला व बालकल्याण सभापती दिपाली भालेकर, नगरसेविका नीलम नाईक, बांधकाम अधिकारी तुषार सरडे, मनोज राऊळ यांच्यासह नगरपरिषदेचे इतर कर्मचारी उपस्थित होते.