शिरगाव येथे मोफत आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद.

देवगड.
तालुक्यातील शिरगाव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई राजे ग्रुप मित्र मंडळ, शिरगाव आर के फाउंडेशन यांच्या सौजन्याने सखी एक निरामय जीवन, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, पुरस्कृत उगम चाइल्ड ट्रस्ट भांडुप मुंबई आयोजित महिलांकरिता भव्य मोफत आरोग्य शिबिर शिरगाव हायस्कूल येथे १९ एप्रिल रोजी संपन्न झाले यावेळी सुमारे २७५ महिलांनी या शिबिराचा लाभ घेतला.
या शिबिराचे उद्घाटन शिरगाव हायस्कूल कमिटीचे चेअरमन राजन चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी शिरगाव हायस्कूलचे प्राचार्य शामसुद्दिन अत्तार, संदीप साटम, माजी सरपंच अमित साटम, मंगेश लोके, ग्रामपंचायत सदस्य स्वाती साटम, शितल तावडे, वैष्णवी अहिर, मयूर चौकेकर, धनराज पारधी, योधीराज राणे, महेश शिरोडकर, दीपक कदम आदी मान्यवर उपस्थित होते.३० ते ६० वयोगटातील सुमारे २७५ महिलांनी आरोग्य तपासणी केली यात तपासणी केलेल्या सर्व महिलांना पोषक कीट वस्तू मोफत देण्यात आले या शिबिराला उमंग चाइल्ड ट्रस्टच्या संचालिका अश्विनी कराडे सल्लागार अब्दुल बेगम भारत पेट्रोलियमचे अधिकारी रवी कदम एमडी पॅथॉलॉजी जयंत मांडोत,डॉ. स्वप्नील विसपुते तज्ञ शुभांगी कोरगावकर प्रतीक्षा सकपाळ आदी उपस्थित होते.