कुणकेरीमध्ये विनापरवाना साग नगांची वाहतूक करणारे तिघे जण पकडले

कुणकेरीमध्ये विनापरवाना साग नगांची वाहतूक करणारे तिघे जण पकडले

सावंतवाडी

 

      कुणकेरी मधील पाळणेकोंड धरण फाट्यावर वनविभागाने वाहतूक तपासणी केली असता, विनापरवाना साग नगांची वाहतूक करत असल्याचे निदर्शनास आले. हा माल शासकीय जंगलातील असल्याच्या संशय आल्याने मालासहित वाहन जप्त करण्यात आले आहे.राजन लिंगू गावडे, योगेश परब व लाडू कुंकेरकर या तिघा आरोपींना वनविभागाने ताबेत घेतले असून, याबाबत पुढील चौकशी कुणकेरी वनपरिमंडळ अधिकारी पृथ्वीराज प्रताप करीत आहेत.