काँग्रेसच्या आंदोलनाला यश

काँग्रेसच्या आंदोलनाला यश

सावंतवाडी

 

     बांदा-दाणोली रस्त्याच्या रुंदीकरण व डागडुजीचे काम येत्या १५ ते २० दिवसांत पूर्ण होईल असा विश्वास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्या पुजा इंगवले यांनी दिली. सावंतवाडी तालुका काँग्रेस अध्यक्ष अभय मालवणकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा व तालुका पदाधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांची भेट घेऊन बांदा-दाणोली रस्त्याच्या दुरवस्थेबाबत निवेदन सादर केले होते. या निवेदनाची तात्काळ दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या. त्यानुसार सध्या रस्त्याच्या रुंदीकरण व डागडुजीचे काम युद्धपातळीवर सुरू असून परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.  यावेळी जिल्हा सरचिटणीस रवींद्र म्हापसेकर, उपसरपंच संतोष कासकर, सगुण गावकर, संतोष तावडे, संदीप सुकी, विनायक सावंत आदी पदाधिकारी उपस्थित होते.