लायन्स क्लबच्या महिलांनी पोलिस कर्मचाऱ्यांना बांधल्या राख्या

लायन्स क्लबच्या महिलांनी पोलिस कर्मचाऱ्यांना बांधल्या राख्या

 

मालवण
 

        मालवण येथे क्रांतिदिन आणि रक्षाबंधनच्या निमित्ताने लायन्स क्लबच्या महिला सदस्यांनी समाजाचे रक्षक असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना पोलीस ठाणे येथे राख्या बांधून त्यांच्या त्याग आणि निःस्वार्थ सेवेला सलाम केला. तसेच समाजाच्या सेवेसाठी अखंडपणे कार्य करणाऱ्या लायन्स क्लबच्या सदस्य व समाजसेवकांनाही राखी बांधत बंधुत्व, जबाबदारी आणि विश्वासाचे नाते दृढ केले.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देऊळवाडा या शाळेतील मुलांनाही राखी बांधून त्यांच्या भविष्यासाठी आशीर्वाद देण्यात आले. यानिमित्त दैवज्ञ भवन येथे मोफत रक्त तपासणी शिबिरही घेण्यात आले. यावेळी लायन्स क्लबच्या अध्यक्षा अनुष्का चव्हाण, सचिव मनाली दळवी, लायन्स सदस्य महेश अंधारी, गणेश प्रभुलकर, रुजारीओ पिंटो, उमेश शिरोडकर, मुकेश बावकर, जयश्री हडकर, फॅनी फर्नांडिस, वैशाली शंकरदास, दीक्षा गावकर, नंदिनी गावकर, श्वेता यादव यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते.