कातवणेश्वर येथे स्वच्छता अभियान उत्साहात संपन्न

कातवणेश्वर येथे स्वच्छता अभियान उत्साहात संपन्न

 

देवगड

 

        मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ग्रामपंचायत कुणकेश्वर आणि भवानी माता कला क्रीडा मंडळ कातवणेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने कातवणेश्वर गाव हद्दीतील देवगड–कुणकेश्वर–मिठबाव मार्गावरील रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडी व झुडपे हटवून स्वच्छता अभियान राबविण्यात आले. हे अभियान दिनांक २ नोव्हेंबर २०२५ रोजी मोठ्या उत्साहात पार पडले.
        या उपक्रमात भवानी माता कला क्रीडा मंडळाचे अध्यक्ष श्री. श्रीकांत केशव भुजबळ, उपाध्यक्ष महेश आईर, कुणकेश्वर ग्रामपंचायतीचे सरपंच महेश ताम्हणकर, उपसरपंच श्री. शशिकांत लब्दे, सदस्य चंद्रकांत घाडी, श्री. संदीप आचरेकर, ग्रामपंचायत अधिकारी श्री. गुणवंत रमेश पाटील तसेच मंडळाचे सदस्य आणि कातवणेश्वर ग्रामस्थ उपस्थित होते.
        सदर उपक्रमामुळे रस्त्याच्या सौंदर्यात भर पडली असून स्वच्छतेबाबत ग्रामस्थांमध्ये जनजागृतीही झाली आहे.