पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा २०२६.....इयत्ता ८वी ची अंतिम गुणवत्ता यादी जाहीर....दुर्वांक मालवणकर ग्रामीण सर्वसाधारण प्रवर्गात प्रथम

पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा २०२६.....इयत्ता ८वी ची अंतिम गुणवत्ता यादी जाहीर....दुर्वांक मालवणकर ग्रामीण सर्वसाधारण प्रवर्गात प्रथम

वेंगुर्ला

    महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 2026 इयत्ता 8 वी ची अंतिम गुणवत्ता यादी जाहीर झाली. यात वेंगुर्ला येथील सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मीडिअम स्कूलचा विद्यार्थी दुर्वांक रामचंद्र मालवणकर याने ग्रामीण सर्वसाधारण प्रवर्गात प्रथम क्रमांक पटकावला आहे.दुर्वांकच्या या यशाबद्दल संस्थेचे उपाध्यक्ष इर्शाद शेख, सचिव दत्तात्रय परुळेकर आणि संचालक प्रशांत नेरुरकर यांनी त्याचे विशेष कौतुक केले.शाळेच्या मुख्याध्यापिका मनिषा डिसोजा तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी दुर्वांकचे अभिनंदन करून त्याला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.