सावंतवाडीतील सेवा अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद, ३५० निवेदने प्राप्त...

सावंतवाडीतील सेवा अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद, ३५० निवेदने प्राप्त...

 

सावंतवाडी 

 

    महाराष्ट्रात भाजप तीन स्तरांवर काम करत असून जनतेची कामे मार्गी लागावीत हाच प्रमुख उद्देश आहे. सावंतवाडीत  आयोजित सेवा अभियानात नागरिकांकडून तब्बल 350 निवेदने प्राप्त झाली असून यातील बहुतांश प्रश्न महसूल विभागाशी संबंधित आहेत. या निवेदनांवर पाठपुरावा करून ती कामे मार्गी लावली जातील, अशी माहिती भाजप नेते आमदार प्रमोद जठार यांनी दिली.सावंतवाडीतील काझी शहाबुद्दीन हॉल येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे स्वीय सहायक संतोष साखरे, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, महेश सारंग, रवींद्र मडगावकर, संदीप गावडे, सुधीर आडिवरेकर, महेश धुरी, मधुकर देसाई, सागर ढोकरे, बाळू देसाई, दिलीप भालेकर आदी उपस्थित होते.सेवा अभियानांतर्गत आमदार जठार व संतोष साखरे यांनी नागरिकांकडून निवेदने स्वीकारली. यातील बहुतांश प्रश्न महसूल विभागाचे असून पाणंद रस्त्यांसंदर्भातील प्रश्नांचा समावेश आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पाणंद रस्त्यांबाबत घेतलेल्या निर्णयाचा पाठपुरावा सुरू असून बहुतांश ठिकाणी प्रश्न सुटला असला तरी काही ठिकाणी तो प्रलंबित असल्याचे जठार यांनी सांगितले.प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून हे सेवा अभियान सुरू करण्यात आले आहे. सध्या सावंतवाडीत हे अभियान राबवले असले तरी भविष्यात प्रत्येक मतदारसंघात हे अभियान घेतले जाणार आहे. प्राप्त झालेल्या निवेदनांपैकी किती प्रश्न मार्गी लागले याचा आढावा पुढील टप्प्यात घेतला जाणार असून सिंधुदुर्गातील दुसऱ्या मतदारसंघातही हे अभियान राबवले जाईल, असे जठार यांनी स्पष्ट केले.