दशावतार कलाकारांना विश्वासात घेऊन मानधन वाढीसाठी शासनाने विचार करावा.....सिंधुदुर्ग पारंपारिक दशावतार संघाची मागणी

दशावतार कलाकारांना विश्वासात घेऊन मानधन वाढीसाठी शासनाने विचार करावा.....सिंधुदुर्ग पारंपारिक दशावतार संघाची मागणी

कुडाळ

 

    दशावतार कलाकारांना दिले जाणारे मानधन वाढवून देण्यासंदर्भात शासन निर्णय करताना थेट कलाकारांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यावा, अशी मागणी सिंधुदुर्ग पारंपारिक दशावतार बहुउद्देशीय संघाच्या माध्यमातून आज येथे करण्यात आली.येथे आयोजित पत्रकार परिषदेत संघाच्या पदाधिकाऱ्यांनी आपली भूमिका मांडली. यावेळी दशावतार कलाकारांच्या प्रश्नांसाठी पोटतिडकीने आवाज उठवणारे आमदार निलेश राणे यांच्यासह इतर नेत्यांचे आभारही मानण्यात आले.संघाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, यापूर्वी शासनाकडून देण्यात आलेले अनुदान थेट दशावतार कंपन्यांना किंवा मालकांना दिले जात होते. त्यामुळे त्याचा थेट फायदा सर्वसामान्य दशावतार कलाकारांना झालेला नाही. परिणामी शासनाची योजना खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे नव्याने शासन आदेश काढताना कलाकारांचा स्वतंत्रपणे विचार करण्यात यावा.दशावतार कला सादर करताना कलाकारांना गणवेश, बूट आणि इतर साहित्य स्वतःच्या खर्चाने खरेदी करावे लागते. मालकांकडून केवळ मुखवटे आणि आयुधे दिली जातात. इतर सर्व साहित्य कलाकारांनाच आणावे लागते. त्यामुळे त्यांच्या अडचणींचा गांभीर्याने विचार करून मानधन वाढीसह इतर सुविधाही उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली.