मोहिनी मडगावकर यांचा भाजप शहराध्यक्ष पदाचा तडकाफडकी राजीनामा
सावंतवाडी
येथील पालिकेच्या नगरसेवक तथा सभापती मोहिनी मडगावकर यांनी आपल्या भाजप शहराध्यक्ष पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. पक्षातील काही व्यक्तींकडून अंतर्गत कुरघोडी केल्या जात असल्यामुळे तसेच पक्षाच्या बैठकीत आपला अपमान केला गेला. त्यामुळे आपल्या सहका-यांसह आपण हा निर्णय घेतला असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.दरम्यान त्यांनी यावेळी महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर यांच्यासह कोलगावातील एका पदाधिकाऱ्यावर सडकून टीका केली.आज येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
konkansamwad 
