कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आ.ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी श्री सद्गुरु लोकमान्य वाचनालयला दिली सदिच्छा भेट.

कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आ.ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी श्री सद्गुरु लोकमान्य वाचनालयला दिली सदिच्छा भेट.

देवरूख.

  कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी आज श्री सद्गुरु लोकमान्य वाचनालय, देवरुखला सदिच्छा भेट दिली.त्यांनी वाचनालयाची सविस्तर माहिती जाणून घेतली आणि शंभर वर्षाहून अधिक काळ कार्यरत असणाऱ्या  वाचनालयाची  सुसज्ज इमारत, स्वच्छता, पुस्तक संख्या, आयोजित करण्यात येणारे विविध उपक्रम याबद्दल गौरवोद्गार काढले आणि सदिच्छा व्यक्त केल्या.त्यांनी वाचनालयातील कर्मचाऱ्यांच्या समस्या आणि वाचनालयांना शासनाकडून मिळणारे अनुदान याविषयी माहिती घेतली. त्याचप्रमाणे ग्रंथालयीन कर्मचाऱ्यांच्या समस्या  सोडविण्यासाठी आणि ग्रंथालयांना मिळणारे अपुरे अनुदान याबाबत शासन दरबारी विषय मांडून त्यामध्ये वाढ होईल यासाठी प्रयत्न करेन असे सांगितले. यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष जी. के. जोशी, कार्यवाह संदीप मुळ्ये, कार्यकारी मंडळ सदस्य किरण देशपांडे, लेखनिक अर्चना राणे आणि सेवक नरेंद्र खेडेकर उपस्थित होते.