सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल, वेंगुर्लाचा दहावीचा निकाल १००%.....सिद्धी गावडे प्रथम
वेंगुर्ले
सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल, वेंगुर्ला या शाळेने दहावीच्या परीक्षेत पुन्हा एकदा 100 टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. शाळेतून परीक्षेसाठी प्रविष्ट झालेले सर्वच्या सर्व 30 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
शाळेतून प्रथम तीन क्रमांक मिळवलेले विद्यार्थी
1. कु. सिद्धी भरत गावडे: 95.20 टक्के
2. कु. श्रावणी रामचंद्र पवार: 90.80 टक्के
3. कु. पुर्वा पांडुरंग कावले: 89.00 टक्के
या यशाबद्दल संस्थेचे उपाध्यक्ष इर्शाद शेख, सचिव दत्तात्रय परूळेकर, संचालक प्रशांत नेरूरकर, मुख्याध्यापिका मनिषा डिसोजा तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
konkansamwad 
