अर्णब चक्रीवादळाचा धोका वाढला....आंध्र प्रदेशसह ५ राज्यांना अतिवृष्टीचा इशारा

अर्णब चक्रीवादळाचा धोका वाढला....आंध्र प्रदेशसह ५ राज्यांना अतिवृष्टीचा इशारा

मुंबई 
 

        बंगालच्या उपसागरात तयार झालेले अर्णब चक्रीवादळ वेगाने तीव्र होत आहे. हे वादळ आंध्रप्रदेशच्या दिशेने सरकत असून उपग्रहाद्वारे घेतलेल्या छायाचित्रांमध्ये वादळाभोवती फिरणारे ढग दिसत आहेत.भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, हे वादळ २८ ऑक्टोबरच्या सकाळी आंध्र प्रदेश आणि यानमच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग तशी ११५ ते १२५ किलोमीटरपर्यंत पोहोचू शकते, तर वाऱ्याचे झोत ताशी १४० किलोमीटरपर्यंत जाण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने आंध्र प्रदेश आणि दक्षिण ओडिशासाठी रेड अलर्ट जारी केला आहे.हवामान विभागाच्या अंदाजानुसार, या प्रणालीच्या पश्चिम-वायव्य दिशेने पुढे जाण्याची आणि आज, २६ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपर्यंत पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरात अधिक तीव्र होऊन त्याचे रूपांतर 'तीव्र चक्रीवादळात' होण्याची दाट शक्यता आहे. त्यानंतर, २७ ऑक्टोबर रोजी याच भागात त्याचे रूपांतर 'अति तीव्र चक्रीवादळात' होण्याची शक्यता आहे. त्यानंतर, हे वादळ वायव्य दिशेने सरकत २८ ऑक्टोबर, २०२६ च्या सकाळपर्यंत आंध्र प्रदेश आणि यानम किनारपट्टीवर आणि विशाखापट्टणम दरम्यान धडकण्याची शक्यता आहे.'